भयानक संकट! मुसळधार पाऊस अन् नदीपात्रात माणसं अडकली; रात्रीच्या अंधारात थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन.

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे चार इसम नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती. अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे चार इसम नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. चिपळूण तालुक्यात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या सगळ्या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने बचावकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये एक महिला, लहान मुलगा व एक इसमाचा समावेश होता.अडकलेले नागरिक नदीपात्रात मासेमारी करायला गेले होते. अचानक पाणी वाढल्याने ते अडकले. मात्र नदीपत्रात एक बेट असल्याने ते सुरक्षित उभे राहिले होते. अन्यथा मासेमारी करायला जाणे, त्यांच्या जीवावर बेतले असते. दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही सुखरूप बचावले आहेत. चिपळूण रेस्क्यू टीम या चौघांसाठी देवदूत ठरली आहे.

त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी चिपळूण रेस्क्यू टीम ॲक्शन मोडवर आल्याचे दिसले.अडकलेल्यांमध्ये संतोष वसंत पवार (४० वर्षे) राहणार दळवटणे त्याची पत्नी सुरेखा संतोष पवार (३५ वर्षे) त्याचा पुतण्या ओंकार रवी पवार (१७ वर्षे) राहणार दळवटणे राजवाडा यांचा समावेश होता. या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.चिपळूण नगरपालिका आणि अग्निशमक विभाग रेस्क्यू टीम घटनास्थळी रात्री नऊच्या दरम्यान दाखल झाली होती. आपत्ती व्यवस्थापन टीममधील निखिल पवार, अजय कदम, आकाश कदम दाखल झाले आहेत. मौजे पिंपळी खुर्द सोनारवाडी येथील नदीपात्रात मासेमारीकरिता गेलेले चार लोक अडकलेले होते, याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीने पाणी थांबवण्याच्या सूचना दिल्या. कोळकेवाडी येथून होणाऱ्या टप्पा एक व दोन बंद करून पाणी सोडण्याचे थांबवण्यात आले आहे.
त्यामुळे आता पाणी कमी झाल्यावर त्यांना नदीपत्रातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठी दोरी घेऊन रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली. तोपर्यंत त्यांना पाण्याजवळ न येता सुरक्षितरित्या बेटांवरतीच उभे रहा, असा धीर देण्यात आला होता. पिंपळी येथील हे चौघेही जण अडकल्याने प्रचंड घाबरले होते. त्यामुळे वैद्यकीय पथकही तैनात ठेवण्यात आलं होतं. सगळ्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

चिपळूण पोलीस, महसूल अग्निशमन दल, नगरपरिषद यंत्रणा आदी घटनास्थळी होत्या. अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यासाठी चिपळूण येथील रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी चिपळूणचे पीआय मेंगडे दाखल झाले होते.रविवारी रात्री उशिरा मान्सून दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी चिपळूण तालुका रेस्क्यू टीमचं टीमवर्क पाहायला मिळालं. चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एक अल्पवयीन मुलगा महिला व इसमाला तब्बल चार तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. महसूल, पोलीस, नगरपालिका, वैद्यकीय विभाग, महानिर्मिती व आपदा मित्र यांचे एकत्रित टीमवर्कचे चिपळूण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांचा ऑपरेशन झालं असतानाही ते बचाव कार्यात दाखल झाले होते. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी रेस्क्यू टीमच्या कामाचा कस लागला होता. या सगळ्या प्रकारावर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस चिपळूण येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने लक्ष ठेवून होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.