भक्तीच्या मारेकऱ्यांना बेड्या, नाशिकच्या कुटुंबाला गुजरातमधून अटक, ‘हायप्रोफाइल’ वसाहतीत खळबळ.

पती आणि सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचे दिलीप माडीवाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अथर्व गुजराथी (36, सिरीन मिडोज), सासरे योगेश मणिलाल गुजराथी व सासू मधुरा योगेश गुजराथी (दोघे रा. नवीन पंडित कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांना गुजरातच्या नवसारीतून अटक करण्यात आली. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली. शहरात ‘हायप्रोफाइल’ वसाहतीत एका विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर पिंपरी चिंचवड येथील हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा होत आहे.भक्ती अथर्व गुजराथी (33, रा. सिरीन मिडोज) यांनी सोमवारी (दि. 19) सकाळी 9.30 च्या सुमारास घरात गळफास घेतला. भक्ती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले (61, रा. येवला) यांच्या फिर्यादीनुसार, भक्ती आणि अथर्व यांचा डिसेंबर 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर अथर्व भक्तीला मारहाण करीत माहेराहून पैसे आणण्यासाठी त्रास देत होता. त्याला कंटाळून भक्ती जानेवारी 2025 मध्ये मुलासह माहेरी आली होती. त्यानंतर दोन-अडीच महिन्यांनी अथर्वने भक्तीला पुन्हा सासरी नेले.

4 मे रोजी भक्तीने पती अथर्व मद्यसेवन करून त्रास देत असल्याची तक्रार तिच्या भावाकडे केली. त्यामुळे भक्तीचे माहेरचे पुन्हा तिच्या सासरी गेले. त्यावेळीही अथर्व व त्याच्या आई वडिलांनी समजूत काढून पुन्हा त्रास देणार नाही असे सांगितले. त्यामुळे नातलग पुन्हा घरी गेले. त्यानंतर सोमवारी (दि. 19) सकाळी भक्तीने गळफास घेतल्याचे समजले.पती आणि सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचे दिलीप माडीवाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अथर्व गुजराथी (36, सिरीन मिडोज), सासरे योगेश मणिलाल गुजराथी व सासू मधुरा योगेश गुजराथी (दोघे रा. नवीन पंडित कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. अथर्वला अटकेच्या मागणीसाठी भक्तीच्या माहेरच्यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता.

येवला अमरधाम येथे भक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, असे फलक हाती धरत तीव्र संताप व्यक्त झाला होता.दरम्यान, शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे ‘प्रभारी’ सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदारांनी तांत्रिक तपास केला. त्यावेळी संशयित अथर्व, योगेश व मधुरा हे नवसारीत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने (दि. 24) वासंदा पोलिसांच्या हद्दीतील गुजरात वनविकास मंडळालगतच्या वनील उद्योग नौताड येथून अथर्व, योगेश गुजराथी (65) यांना ताब्यात घेतले. अथर्वची कार व मोबाइल असा एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.