नणंद-नवऱ्याच्या जाचामुळे पुण्यात 22 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, पिंपरी पोलीस थेट परभणीत पोहोचले अन्…

माहेरहून 50 हजार रुपये आणावे यासाठी महिलेकडे सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड भागातील म्हाळुंगे येथील विवाहितेने सासराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकारणी म्हाळुंगे पोलिसांनी दोघांना परभणीतून ताब्यात घेतले आहे.माहेरहून 50 हजार रुपये आणावे यासाठी महिलेकडे सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.पूजा निर्वळ, वय 22 वर्ष, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यादव यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

27 एप्रिल 2025 रोजी ही घटना घडली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचा पती गजानन निर्वाळ हा परभणी येथील राहणारा आहे. पुण्यातील म्हाळुंगे परिसरात ते वास्तव्यास होते. नवरा गजानन आणि नणंद यांनी पूजाने माहेरहून 50 हजार रुपये आणावे यासाठी तिचा छळ लावला होता. या छळला कंटाळून अखेर पूजाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप आहे.या घटनेनंतर नवरा आणि नणंद फरार झाले होते. मात्र पूजाने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होता. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता परभणीमध्ये जाऊन अटक केली आहे.

पुण्यात सातत्याने हुंड्यामुळे घडत असलेल्या घटनांमुळे हुंड्यासाठी होणाऱ्या छळाबद्दल चिंता निर्माण झाली आहे आणि अशा घटना रोखण्यासाठी कडक कायद्यांची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.दरम्यान, वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. तिच्या आई- वडिलांचे सांत्वन करण्यासाठी नुकतेच रामदास आठवले, करुणा शर्मा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनीही भेट दिली. कस्पटे कुटुंबियांकडून घटना जाणून घेऊन संवेदना व्यक्त केल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.