मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. आज दिनांक २४ मे रोजी विविध प्रकारच्या एकूण ३३ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामध्ये श्रमदानातून वृक्षारोपण ही संकल्पना राबवण्यात आली. लावण्यात आलेल्या झाडांमध्ये आंबा, चिंच, सिताफळ, करंज, कदंब, इंग्रजी चिंच, फापडा अशा स्थानिक आणि पर्यावरणपूरक प्रजातींचा समावेश होता.
मा. अमित ठाकरे यांचे पर्यावरणाविषयी असलेले भान व जाणीव लक्षात घेता त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून “वाढदिवस साजरा करण्याची नवी दिशा आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प” असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, उपमहानागराध्यक्ष, ललित शर्मा, श्रीकृष्ण मेंगडे, सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, साजन पाटील, प्रकाश जोशी, राहुल चव्हाण, संदीप मांडोळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते.









