आज मौजे कढोली तालुका एरंडोल येथे महसूल पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अवैध वाळू उपसा विरुद्ध धडक कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रॅक्टर, 2 केनी मशीन , दोर खंड व 2 फावडे 2 पुली जप्त केले. सदर जप्त वाहने व साहित्य तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहेत
सदर कारवाई तहसीलदार एरंडोलप्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रिंगणगाव संजय साळुंखे व मंडळ अधिकारी उत्रण नदीम शेख, तलाठी नितीन पाटील तलाठी कढोली रोहित इंगळे तलाठी वैजनाथ तलाठी उत्रण शिवाजी घोलप,तलाठी अमर भिंगारे ,तलाठी वैभव पाठे,
तलाठी मयूर कुलकर्णी , तलाठी संदीप पाटील तलाठी अक्षय बनकर ,सुदर्शन पवार ,रविराज पाटील ,यांनी केली सोबत पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील पोलिस नाईक दत्ता ठाकरे व दीपक पाटील, यांनी वाहने तहसील कार्यालय येथे जमा करणे कामी मदत केली









