सोलापूरच्या कुसूरमध्ये एका धक्कादायक घटनेत, जन्मदात्या बापानेच आपल्या आठ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. नराधमाने हे कृत्य करून, मुलीला शेतात पुरले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून करून शेतातील वस्तीसमोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही, हे शवविच्छेदन झाल्यानंतर कळणार आहे. दरम्यान मंद्रूप पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. पोटच्या नऊ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा करून बापाने तिचे प्रेत पुरल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे गुरुवारी २३ मे रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली.पोटच्या मुलीला तिच्या वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली. त्यांनी ही माहिती मंद्रुप पोलिसांना दिली. आरोपी बापाने स्वतः गळा दाबून हत्या केल्याची कबुली नातलगासमोर दिली आहे. ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे (३४) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.










