वैष्णवीने जीव दिला; पश्चाताप तर सोडा सुनेच्या अंत्यविधीपूर्वी सासऱ्याची मटण पार्टी, राजेंद्र हगवणेचे कारनामे CCTVमुळे उघड.

वैष्णवी हगवणेने सासरच्या अमानूष छळाला कंटाळून आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेने साऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. गडगंज श्रीमंत असलेल्या या हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी वैष्णवीचा अतोनात छळ केला, ज्यातून तिने आपला जीव दिल्याचा आरोप आहे.वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजत आहे. त्यात मुख्य आरोपी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या विकृत मानसिकतेच्या कुटुंबाला पोलिसांनी अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. मात्र, राजेंद्र हगवणेचे एक- एक करनामे आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. फरार झाल्यानंतर सुनेच्या अंत्यविधीच्या अगोदरच त्यांनी मावळ येथे एका हॉटेलवर मटण पार्टी केल्याचे समोर आले आहे.16 मे रोजी वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या आयुष्याची अखेर केली होती. त्यानंतर रुग्णालयात वैष्णवीला दाखल केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने त्यांनी पलायन केले होते.

त्यानंतर सात दिवसानंतर पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट भागातून सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला ताब्यात घेतले.या फरार सात दिवसांच्या कालावधीत त्यांनी बावधन, वडगाव मावळ, पवनानगर, आळंदी, वडगाव मावळ, पवनानगर, पुसेगाव, कोगनळी व पुणे असा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना ज्यांनी आश्रय दिला ते चर्चेत येऊ लागले आहेत.वैष्णवीच्या आम्हत्येनंतर संपूर्ण हगवणे कुटुंबं अटकेत असून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी समाजाच्या सर्वच सस्तरातून होत आहे. तसेच घटना घडल्यानंतर सर्वच पक्षांचे राजकीय नेते कस्पटे कुटुंबियांच्या भेटीसाठी येत आहेत.

या प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील सर्वच पक्षांनी धारेवर धरले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे तर, या प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला धोका केल्याच्या आरोपाखाली, तसेच कस्पटे कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैष्णवी हगवणे प्रकरणाने समाजात असलेल्या हुंडा घेण्याची प्रथा आधुनिक युगात सुरु असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. वैष्णवी हगवनेच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.