वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत. वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळावर अत्याचार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी सासरा राजेंद्र आणि मुलगा सुशीलला अटक केली आहे. लग्नात ५१ तोळे सोने आणि गाडी दिली होती. वैष्णवीच्या वडिलांना नातू आणण्यास गेल्यावर धमावण्यात आले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. फक्त वैष्णवीच नाही तर तिच्या १० महिन्याच्या बाळावरही हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा संशय आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अखेर सासरे राजेंद्र आणि मोठा मुलगा सुशील यांना अटक केलीये. वैष्णवी हगवणे प्रकरणात काही ऑडिओ आणि स्क्रीनशॉर्ट देखील व्हायरल होताना दिसत आहेत. वैष्णवीच्या अंगावरील जखमा बरेच काही सांगून जात आहेत. वैष्णवीने कुटुंबियांच्या विरोधात जात शंशाकसोबत लग्न केले. तब्बल ५१ तोळे सोने आणि आलिशान गाडी देखील लग्नात हगवणे कुटुंबियांना देण्यात आली.










