पतीला संपवलं, नंतर त्याच्याच मोबाईलवरुन मित्रांशी संवाद; मेसेजमधील एका शब्दांमुळे बिंग फुटलं.

यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका निधी देशमुखने पती शंतनूची विष देऊन हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह जाळला. नंतर मृत शंतनूच्या मित्रांना पाठवलेल्या मेसेजमधील एका शब्दाने तिच्या गुन्ह्याची उकल झाली.विष देऊन शंतनूची हत्या केल्यानंतर मुख्याध्यापिका निधी देशमुखने त्याचा मोबाइल स्वत:जवळ ठेवला. चार दिवस या मोबाइलवरून स्वत:सह त्याच्या मित्रांना मेसेज करू लागली. एक दिवस चुकीने तिने ‘भय्या’ शब्द मेसेजमध्ये वापरला. यावरून शंतनूच्या मित्रांचा संशय बळावला. निधीच हे मेसेज पाठवित असल्याचा विश्वास पक्का होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तातडीने निधी आणि तिच्या भावाला ताब्यात घेतले गेले. आपला भाऊ अडकणार हे लक्षात येताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.यवतमाळच्या दारव्हा रस्त्यावरील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शंतनू अरविंद देशमुख तात्पुरत्या स्तरावर शिक्षक म्हणून कार्यरत होते. याच शाळेत त्यांची पत्नी निधी ही मुख्याध्यापिका आहे.

 एकाच शाळेत असल्याने दोघांमध्ये प्रेम फुलले. दोघांनीही आयुष्यभर सोबत राहण्याचा निश्चय केला. आंतरजातीय प्रेमविवाह केला. त्यांचा हा विवाह दोन्हीकडील कुटुंबांना मान्य नव्हता. विरोध झुगारून उभारलेला त्यांचा संसार काही दिवस सुरळीत चालला. शंतनूला दारूचे व्यसन जडले. तो पैशांसाठी निधीला मारहाण करू लागला. याया विचारातून १३ मे रोजी रात्री इंटरनेटवरून पाहून विष तयार केले. हे विष देऊन पतीला ठार मारले. नंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने चौसाळाच्या जंगलात मृतदेह जाळला होता. पण, शंतनूच्या मित्रांना पाठविलेल्या मेसेजमधील तिच्या नेहमीच्या ‘भय्या’ या शब्दाचा वापर केल्याने हत्या प्रकरणाचे गूढ उलगडले.दारूसाठी पैसे मागताना शंतनू हा मुख्याध्यापिका निधीला मोबाइलमधील आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरही शंतनू मारहाण करीत होता. आपल्या शिक्षिकेला मारहाण होत असल्याचे पाहून निधीविषयी विद्यार्थ्यांच्या मनात सहानुभूती वाढली. ही सहानुभूती हेरून तीन विद्यार्थ्यांना तिने आपल्या कटात सहभागी करून घेतले.तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षक पतीला ठार मारून मृतदेह पेटविणाऱ्या मुख्याध्यापिका निधी देशमुख हिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. या प्रकरणात इतरही काही आरोपी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.