मध्यरात्री २ लाखांचे मोबाईल लांबविले : चोरट्याच्या मुसक्या आवळल्या !

रात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्यांच्या घरातून दोन लाख रुपयांचे महागडे मोबाईल चोरुन नेले होते. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित त्या अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नशेमन कॉलनीत तन्वीर मजहर पटेल हे वास्तव्यास असून दि. १८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.

घरातून २ लाख रुपये किंमतीचे तीन महागडे मोबाईल चोरुन नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे,

चंद्रकांत धनके, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर, योगेश बारी, योगेश घुगे यांचे पथक तयार केले.पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक अल्पवयीन मुलगा संशयास्परित्या फिरतांना दिसला. त्यानुसार पथकाने त्या मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले तीन मोबाईल देखील काढून दिले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.