अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ‘मी भाजपचा नाही, तर राष्ट्रवादीचा मंत्री आहे,’ असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मंत्री बनवण्यासाठी प्रयत्न केले, असंही भुजबळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र सदन प्रकरणात निर्दोष सुटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ओबीसी समाजासाठी लढण्यास तयार असल्याचं भुजबळ म्हणाले.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर दौऱ्यावर असताना आपल्यावर होणाऱ्या टीकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले “जे लोक माझ्यावर टीका करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, मी भाजपाचा मंत्री नाही, मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री आहे. मला मंत्री करायचं की नाही, हे राष्ट्रवादी ठरवते. निर्देश देण्याचं काम मुख्यमंत्री करतात,” असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच शुक्रवारी नागपूरला आले होते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
भुजबळ म्हणाले की, “सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्री बनवण्यासाठी प्रयत्न केला होता. फक्त तेच नाही तर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी पक्षाने निर्णय घेतला आणि मी मंत्री होऊ शकलो नाही.”भुजबळ मंत्री झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. फडणवीस यांचे जुने वक्तव्य दाखवत विरोधकांनी भाजप आणि छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला आहे. भ्रष्टाचारावरील टीकेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, “जे लोक माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांना मी सांगतो की मी भाजपाबरोबर नसताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना माझ्या प्रकरणाचा निकाल लागला होता. ८० पानांचा निकालसमोर आला आणि प्रकरण संपलं. मला आणि इतर संबंधितांना निर्दोष घोषित करण्यात आलं आहे.” असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.महाराष्ट्र सदन प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र सदन तयार झालं आहे,









