‘गृहमंत्री पदासाठी हसन मुश्रीफ हे उत्तम चॉईस होते, पण धर्म आडवा आला’, संजय राऊतांचं पुस्तकात मोठं वक्तव्य.

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकात अनेक दावे केले आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राऊतांनी या पुस्तकात मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतही मोठा दावा केला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी पडद्यामागील अनेक राजकीय घडामोडींचा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली असली तरी अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली होती. तसेच निकालानंतर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा आग्रह होता. ते भाजपला अमान्य होतं. यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. किमान समान वाटपाच्या धर्तीवर तीनही पक्षांचं एकमत झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापनेवेळी गृह खातं हे राष्ट्रवादीला मिळालं.

त्यावेळी हसन मुश्रीफ हे गृहमंत्री पदासाठी उत्तम चॉईस ठरले असते, असं संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.”महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी”, असं संजय राऊत पुस्तकात म्हणाले आहेत.”जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. ‘तो एक थैंकलेस जॉब आहे,’ असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते.

परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते पण शेवटी धर्म आडवा आला”, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी पुस्तकात केलं आहे.”गृहमंत्री कोण? या प्रश्नावर एकदा पवार म्हणाले, “विदर्भातला नवा प्रयोग करून पाहू या!” तो प्रयोग म्हणजे अनिल देशमुख. देशमुखांनी गृहखाते उत्तमरीत्या सांभाळले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते होते. पण तीन प्रमुख पक्षांत बदल्या, बढत्या आणि नेमणुकांच्या कटकटी असतात. त्या देशमुखांच्या वाट्याला आल्या. देशमुख हे नागपूरचे. त्याआधी फडणवीस हेच नागपूरचे सत्ताकेंद्र होते. देशमुख गृहमंत्री होताच सर्व काही बदलले. देशमुखांचा नागपूर-विदर्भातील वाढता प्रभाव, गृहखात्याचे वलय, त्यांना मिळणारे सॅल्यूट हे जुन्या सत्ताकेंद्रास सहन झाले नाहीत आणि तेथूनच देशमुखांच्या रस्त्यात काटे निर्माण होऊ लागले”, असा दावा संजय राऊतांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.