पार्टी न दिल्याने दोघांकडून मित्राला बेदम मारहाण; नाकाचे हाड मोडले, कोंढव्यातील प्रकार.

दोघांनी दारूच्या नशेत मित्रावरच प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. यामध्ये पीडित तरुणाच्या नाकाचे हाड फ्रेंक्चर झाले आहे.नवीन दुचाकी घेतल्याची पार्टी न दिल्याने दोघांनी दारूच्या नशेत मित्रावरच प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. यामध्ये पीडित तरुणाच्या नाकाचे हाड फ्रेंक्चर झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास साळुंखे विहार रस्त्यावर एका वाइन शॉपजवळ घडला.
या प्रकरणी ३० वर्षीय तरुणाने (रा. एनआयबीएम रस्ता) तक्रार दिली आहे. त्यावरून किरण सरोद (रा. एसआरए बिल्डिंग, कमेला, कोंढवा) आणि अन्य एकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कामावरून घरी जात असताना दोघे आरोपी वाटेत त्याला भेटले. तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी नवीन दुचाकी घेतली होती. त्यानिमित्ताने पार्टी देण्याचा आग्रह आरोपींकडून केला जात होता . मात्र, तक्रारदाराने पार्टी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी रागाच्या भरात तक्रारदाराला शिवीगाळ केली.त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एकाने तक्रारदाराच्या नाकावर जोरात ठोसा मारल्याने तरुणाच्या नाकाचे हाड मोडले .

या घटनेनंतर तक्रारदाराने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेतली . सहायक निरीक्षक सतीश थोरात याचा तपास करीत आहेत.नांदेड सिटी परिसरात एका तरुणीकडे तिच्या आधीच्या प्रियकराने पाचशे रुपयांची मागणी करून, पैसे न दिल्यास ‘ तुझ्या वडिलांना जीवे मारून, स्वतःदेखील आत्महत्या करीन ,’ अशी धमकी दिली . त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने संबंधित प्रियकराचे घर गाठले. मात्र, तरुणीने पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाने तरुणीला लेदरच्या पट्ट्याने मारहाण केली. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आकाश गुलाब ढावरे ( रा. रायकर मळा, धायरी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.