बीकॉमच्या विद्यार्थ्याचा संतापजनक कारनामा, कंपनीच्या मशीनवर देशविरोधी मजकूर, ATS कडून तपासाला सुरुवात.

 एक्सीडी इंडिया कंपनीत जानेवारी 2025 मध्ये उमर हा डिक्स असेंबली विभागात रुजू झाला. 19 मे रोजी रात्री कंपनीतील मार्किंग मशीन वर त्याने भगव्या रंगात पाकिस्तान जिंदाबाद असे इंग्रजी मधून मजकूर लिहिला. त्यानंतर मशीनवरच पिवळ्या, पांढऱ्या, तांबड्या आणि निळ्या रंगाच्या रेषा मारल्या. उमरची शिफ्ट संपल्यानंतर तिसऱ्या शिफ्ट साठी कामगार बदलले.चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सीडी इंडिया कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने कंपनीतील मशीनवर भगव्या रंगाने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर लिहिला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. उमर गफार शेख वय २२ राहणार आयेशा पार्क नारेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उमर चे वडील मजुरी करतात. त्याला एक लहान भाऊ आहे. उमर हा खुलताबाद येथील कोहिनूर कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. या कॉलेजमध्ये त्याचं बीकॉमचं तिसऱ्या वर्षाचं शिक्षण सुरू आहे.

एक्सीडी इंडिया कंपनीत जानेवारी 2025 मध्ये उमर हा डिक्स असेंबली विभागात रुजू झाला. 19 मे रोजी रात्री कंपनीतील मार्किंग मशीन वर त्याने भगव्या रंगात पाकिस्तान जिंदाबाद असे इंग्रजी मधून मजकूर लिहिला. त्यानंतर मशीनवरच पिवळ्या, पांढऱ्या, तांबड्या आणि निळ्या रंगाच्या रेषा मारल्या. उमरची शिफ्ट संपल्यानंतर तिसऱ्या शिफ्ट साठी कामगार बदलले. कामगार कामावर आल्यानंतर त्यांना मशीनवर हा मजकूर आढळून आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.या संपूर्ण प्रकरणामुळे कंपनीत एकच खळबळ उडाली. चौकशीनंतर हा मजकूर उमर शेख या कामगाराने पुन्हा पुसून टाकल्याचे स्पष्ट झालं. कंपनीने याबाबत त्याला विचारल्यास मी गमतीने हा मजकूर लिहिला आहे असं त्याने सांगितले. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी उमरचा लॅपटॉप, दोन सिम कार्ड, बँकेचे पासबुक यासह सिम कार्डची रिकामी पाकिटे आढळून आली असून पोलिसांनी ती जप्त केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर हे करीत आहेत.पहलगाम हल्ल्यामुळे देशभरामध्ये पाकिस्तान विरोधात शीळ निर्माण झालेली असताना छत्रपती संभाजी नगरच्या तरुणाने पाकिस्तान जिंदाबाद हा मजकूर लिहिला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दहशतवादी विरोधी पथकाने ही उमरची चौकशी केली आहे. देशात पाकिस्तान विरोधी वातावरण असताना उमरणे पाकिस्तान जिंदाबाद का लिहिले? उमरला कोणी लिहायला सांगितले का? पैशाच्या आमिषाने हे लिहिले गेले का? यासह इतर प्रश्नांची उत्तरांचा शोध एटीएस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.