१५ कोटीचं टार्गेट, १० कोटी जालन्यात जमा करायचेत; खोतकरांच्या PA प्रकरणात राऊतांचा खळबळजनक दावा.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांच्या पीएवर गंभीर आरोप केले. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात खोतकर यांच्या पीएच्या खोलीत कोट्यवधी जमा करण्यात आले होते, असा दावा राऊतांनी केला आहे.संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत आढळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुद्दयावरुन आरोप केले. याबाबत बोलताना ते म्हणाले, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात १०२ नंबरची खोली ही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावावरील खोली आहे. त्या खोलीत सर्वप्रकारच्या ठेकेदारांनी ५ कोटी रुपये दोन दिवसांत जमा केले, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘खोलीत कोट्यवधी सापडल्याने गडबड झाल्यानंतर मोठी रक्कम घेऊन कैलास पाटील बाहेर गेले, २ कोटी तिथेच राहिले. दोन कोटी ही मोठी रक्कम नाही.

१५ कोटीचं टार्गेट आहे. १० कोटी जालन्यात जमा करायचे आहेत. पुढील २४ तासात समितीचं काम संपल्यावर, समिती तेथून गेल्यावर जालन्यात हे १० कोटी जमा करायचे होते.’गोंधळ झाल्यावर लोकल सरकारने एसआयटी नेमली. ला कालमर्यादा आहे का? इतर वेळी सरकार कधी भ्रष्टाचाराच्या कामात एसआयटी स्थापन करतात का? शासकीय कर्मचाऱ्याकडे दोन कोटी सापडले आहेत, जो कर्मचारी अंदाज समितीच्या अध्यक्षांचे पीए आहेत. अर्जुन खोतकर मंत्री असतानाही हे पीए त्यांच्यासोबतच होते असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आमदार अर्जुन खोतकर हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत. धुळ्यात विकास कामांच्या पाहाणीसाठी ही समिती आली होती. यावेळी धुळ्यात शासकीय निवासस्थानी अर्जुन खोतकर यांचे पीए अर्थात स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने खोली बुक करण्यात आली होती. त्या खोलीत कोट्यवधी रुपये आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावरुन राज्यात एक खळबळ माजली असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनीही गंभीर आरोप केले आहेत. अनेक शासकीय कार्यालयांमधून शासकीय विश्रामगृहात पैसे पोहोचले असल्याचा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.