कॅबिनेटमध्ये पुनरागमन, आता छगन भुजबळांचं खातं जाहीर, फडणवीसांकडून मोठी जबाबदारी.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे हे खाते होते, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते रिक्त खातं भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं जाहीर करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांनी मार्चमध्ये आपल्या अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेलं हे खातं भुजबळांना सोपावण्यात आलं आहे.छगन भुजबळ यांनी २० मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज २३ मे रोजी त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलं आहे.

याआधी सरकारमध्ये असताना भुजबळांकडे हेच खातं होतं. त्यानंतर आता पुन्हा हेच खातं त्यांना अधिकृतरित्या देण्यात आलं आहे.धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यात त्यांच्या खात्याचा राजीनामा दिला होता. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समाजमाध्यमांवर त्यांच्या मारहाणीचे अतिशय भयंकर फोटो समोर आले होते. याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर मुंडेंनी त्यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याचा राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांच्या पीएकडून आपला राजीनामा पाठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला.

एक जबाबदार राजकीय नेता म्हणून नैतिकतेच्या मुद्यावरुन आपण राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली होती.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवार यांनी हे खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र आता छगन भुजबळ यांना हे खातं सोपावण्यात आलं आहे. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंनी जवळपास अडीच महिन्यांनी राजीनामा दिला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.