अखेर वैष्णवीच्या दीर-सासऱ्याला अटक, रुपाली चाकणकरांचा मोठा इशारा, म्हणाल्या – ही विकृती…

 बावधन पोलिसांनी वैष्णवी हगवणेच्या सासरा आणि दीराला अटक केली आहे. त्यांना पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती, सासू आणि ननंद यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती.वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी सात दिवसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (23 मे) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास बावधन पोलिसांनी या दोघांना अटक केली. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. हुंड्यामुळे वैष्णवीचा अतोनात छळ झाला आणि त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. गेल्या सात दिवसांपासून पोलीस या दोघांच्या शोधात होते. अखेर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यावर राज्य माहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांचं कौतुक केलं आहे, तसेच कुणालाही सोडणार नाही, असं आश्वासनही दिलं आहे.

“आरोपींना अटक झाली आहे, राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही पहिल्याच दिवशी सुमोटो दाखल केला होता. पाचही आरोपींवर गुन्हा नोंद आहे. तीन आरोपी अटकेत असताना दोन आरोपी फरार होते, त्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चांगलं काम करत स्वत:चं पथक आणि क्राइम, सायबर टीम हे सर्व फरार आरोपींना शोधण्याचं काम सुरु होतं. आज त्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था त्यांचं काम चोखपणे करत आहे.””काहीप्रमाणात आपलीही जबाबदारी आहे. अशाप्रकारे हुंडाबळीला कुणाला सामोरे जावं लागू नये. म्हणून ज्या प्रकारे बालविरोधातील कायदा आहे, गर्भनिदान चाचणीविरोधातील कायदा आहे, त्याचप्रमाणे हुंडा प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. हुंडा मागणाऱ्यांइतके देणारेही दोषी आहेत. त्यामुळे हुंडा देऊ नये.””जर आरोपींचा शोध घ्यायचा नसेल किंवा टाळाटाळ करायची असेल तर आजही ताब्यात घेतलं नसतं. यात बऱ्याच गोष्टी समोर येतील. पण, पहिल्या दिवसापासूनच पोलीस प्रयत्न करत होते. पोलिसांनी सांगितलं होतं की, जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांचं लोकेशन मिळालं, तेव्हा आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते निघून गेलेले असायचे. पोलिसांचा तपास पहिल्या दिवसापासून सुरु आहे. कारवाई सुरु आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा कुठलाही हेतू नाही. जो चुकीचा आहे तो चुकीचाच आहे, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे ही विकृती ठेचून काढायची आहे, कायद्याच्या चौकटीत राहून आरोपींवर कारवाई होणार आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.