जेवण केलं, मळमळ, दोन तासात दहा वेळा उलट्या अन् 30 वर्षांच्या डॉक्टरचा हादरवणारा अंत, काय घडलं?

 एका डॉक्टरला अचानक त्रास जाणवू लागला. त्याला दोन तासात तब्बल आठ-दहा वेळा उलट्या झाल्या, अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.हार्ट अटॅकने एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा डॉक्टर फक्त 30 वर्षांचा असल्याची माहिती आहे. ते डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये इंटर्नशिप करत होते. डॉ. विवेक कुमार पांडे (३०) असं त्यांचं नाव असून बुधवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांना पाच वर्षांपासून रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहीद पथ येथील वसतिगृहात जेवणानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. दोन तासांत त्यांना आठ ते दहा वेळा उलट्या झाल्या आणि छातीत दुखू लागले होते. यावर, सहकारी डॉक्टरांनी त्यांना लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये आणले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

प्रतापगड येथील रहिवासी विवेक यांनी 2018 मध्ये लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पाच वर्षांपासून मधुमेह आणि बीपीने ग्रस्त होते. ते त्यासाठी नियमितपणे औषध घेत होते. एमबीबीएसनंतर ते त्याच संस्थेत इंटर्नशिप करत होते आणि शहीद पथ येथील एमबीबीएस इंटर्न हॉस्टेलमध्ये राहत होते.बुधवारी (23 मे) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर डॉक्टर विवेक यांची प्रकृती बिघडू लागली. अस्वस्थता आणि छातीत दुखण्यासोबतच त्यांना उलट्या देखील सुरू झाल्या. रात्री 12 वाजताच्या सुमारास सहकारी डॉक्टरांनी त्यांना लोहिया इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केले. रात्री त्यांच्या उपचारासाठी तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञही आले. आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांची एक तज्ज्ञ टीम त्यांच्यावर उपचार करत होती, परंतु त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. त्यांच्या मृत्यूने साऱ्यांना धक्का बसला आहे.हृदयरोग विभागाचे प्रमुख आणि लोहिया इन्स्टिट्यूटच्या मीडिया सेलचे प्रभारी, प्रोफेसर भुवन चंद तिवारी यांनी सागितलं की, डॉ. विवेक यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले. आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या ईसीजी आणि ट्रॉप-टी चाचण्या करण्यात आल्या. त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला. ट्रॉप-टी चाचणी पुन्हा करण्यात आली, पण दुसऱ्यांदाही अहवाल निगेटिव्ह आला. अशा परिस्थितीत हृदयविकाराची पुष्टी करता येत नाही. बऱ्याच वेळा, तीव्र हृदयविकाराचा झटका येऊनही, चाचणी अहवाल निगेटिव्ह येतो. या प्रकरणातही असेच काहीतरी घडल्याचं कळतं.लहान वयात हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. तरुणांसोबतही हेच घडत आहे. अशा परिस्थितीत हृदयाच्या आरोग्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. डॉ. विवेक यांनाही अनेक वर्षांपासून मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. अशा जीवनशैलीशी संबंधित समस्या तरुणांसाठी घातक ठरत आहेत, असं ही प्रोफेसर भुवन यांनी सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.