भरसभेत अजित दादा म्हणाले, ‘जन्माला आल्यापासून पाण्याशिवाय दुसऱ्या एका थेंबालाही हात…’; एकच हशा पिकला.

 चालू कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना पाण्याची बॉटल दिली यावेळी एक माध्यम प्रतिनिधी कॅमेऱ्याची सेटिंग करण्यासाठी उभा राहताच जोरदार टोलेबाजी केली.चालू कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना पाण्याची बॉटल दिली, दरम्यान एका माध्यम प्रतिनिधीने मोबाईल कॅमेऱ्याची सेटिंग करण्यासाठी तो उभा राहिला. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. आणि सभेत एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील पक्ष कार्यालयात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करीत असताना अजित पवारांना तहान लागली. त्यावेळी त्यांनी पाण्याची मागणी केली असता त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना पाण्याची बॉटल दिली. दरम्यान माध्यमाचा प्रतिनिधी आपला कॅमेरा ऍडजेस्ट करण्यासाठी उभारल्याचे पाहताच अजित पवार आपल्या खास शैलीत म्हणाले की, हे पहा पाणी प्यायला लागलो तरी, कॅमेरा ऍडजेस्ट करायला लागला. असं म्हणत त्यांनी कपाळावर मारून घेतले व म्हणाले अरे पाणी तरी पिऊ दे. पाणीच पीत आहे दुसरं काही पीत नाही. आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसरा एक थेंबही हात लावला नाही. एवढा एकच नेता आहे, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.काहींना वाटत होतं की, ताबडतोब निवडणूक व्हावी (माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक) मात्र मी गप्प बसलो होतो. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होईपर्यंत. माळेगाव कारखान्याची निवडणूक घ्यायची नाही. तरी अनेक जण मुख्यमंत्र्यांना माळेगाव कारखान्याची निवडणूक लावा, म्हणून भेटत होते. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, तो माझा मतदारसंघ आहे. आपण महायुतीचे घटक आहोत. छत्रपती सहकारी कारखान्याचे निवडणूक झाली की न सांगता माळेगावची निवडणूक घेणार आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.