पुणं पुन्हा हादरलं! सासरच्यांचा हुंड्याचा हव्यास संपेना; विवाहितेनं कंटाळून आयुष्य संपवलं.

पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं आयुष्य संपवलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पुणे: पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं आयुष्य संपवलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपा प्रसाद पुजारी असं विवाहितेचं नाव आहे. तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पुण्यात झालेल्या या आत्महत्यांच्या घटनांमुळे समाजात आजही हुंड्याची प्रथा कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे.वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असताना पुण्याच्या हडपसरमध्ये तशीच घटना घडली आहे. मनासारखा हुंडा, मानपान न मिळाल्यानं सासरच्यांनी दीपाचा छळ सुरु केला. या जाचाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे, दीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीपा पुजारी मृत्यूसमयी केवळ २२ वर्षांची होती.

देवकीचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी देवकीचा पती प्रसाद पुजारी, दीर प्रसन्ना पुजारी, सासू सुरेखा पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकी उर्फ दीपाचे वडील मूळचे कर्नाटकचे राहिवासी आहेत.पुणे: पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं आयुष्य संपवलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपा प्रसाद पुजारी असं विवाहितेचं नाव आहे. तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पुण्यात झालेल्या या आत्महत्यांच्या घटनांमुळे समाजात आजही हुंड्याची प्रथा कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असताना पुण्याच्या हडपसरमध्ये तशीच घटना घडली आहे. मनासारखा हुंडा, मानपान न मिळाल्यानं सासरच्यांनी दीपाचा छळ सुरु केला. या जाचाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे, दीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीपा पुजारी मृत्यूसमयी केवळ २२ वर्षांची होती. देवकीचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी देवकीचा पती प्रसाद पुजारी, दीर प्रसन्ना पुजारी, सासू सुरेखा पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकी उर्फ दीपाचे वडील मूळचे कर्नाटकचे राहिवासी आहेत.दीपा आणि प्रसाद यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता. लग्नात मनासारखा हुंडा न मिळाल्यानं सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरु केला. दीपाच्या कुटुंबियांनी लग्नात ४ तोळं सोनं, १० लाख रुपये दिले होते. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद आणि त्याची आई सुरेखानं लग्नात फ्रीज, भांडी दिली नाहीत, मानपान केलं नाही म्हणत वाद घातला. दीपाला शिवीगाळ केली.घडलेला प्रकार दीपानं तिच्या वडिलांच्या कानावर घातला. दीपा माहेरी निघून गेली. यानंतर दीपाच्या सासऱ्यानं तिची समजूत घालत पुन्हा सासरी आणलं. १८ मे रोजी दीपानं वडिलांना फोन केला आणि ती रडू लागली. लग्नात भांडी, सामान दिलं नाही म्हणून पती, दीर, सासू, सासरे शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याची तक्रार दीपानं वडिलांकडे केली. मी पुण्यात येतो आणि वाद सोडवतो असं म्हणत दीपाच्या वडिलांनी तिची समजूत काढली. पण १९ मे रोजी दीपानं राहत्या घरात गळफास लावून आयुष्य संपवलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.