नवीन मोबाईल तुला कोणी दिला? पत्नीने उत्तर न दिल्याने पती संतापला आणि अचानक चुलीत…हैराण करणारी घटना.

पिंकाबाई देवळे या महिलेचा तिच्या पतीने मोबाईलवरून झालेल्या भांडणानंतर खून केला. संशयित आरोपी संजय देवळे याने पत्नीला काठीने मारहाण करून गळा दाबून तिची हत्या केली. आरोपीने गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात उघडकीस आली.तुला हा नवीन मोबाईल कोणी दिला? पत्नीने काही एक उत्तर न दिल्याने रागाच्या भरात पतीने तो मोबाईल चुलीत फेकून दिला. यावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर काठीने बेदम मारहाण करून गळा दाबून पत्नीचा खून पतीने केला. हेच नाही तर पत्नीचा खून करून आरोपी घरातच झोपी गेला. ही घटना कन्नड तालुक्यातील मोहिंद्रा शिवारात बुधवार २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंकाबाई संजय देवळे (वय २७) रा.बोरगाव मध्यप्रदेश असे मयत महिलेचे नाव आहे. संजय देवळे असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील पीशोर जवळ असलेल्या मोहिंद्रा येथे निवृत्त शिक्षक अवचितराव भीमराव जाधव यांची शेती आहे. त्यांच्या या शेतामध्ये मध्यप्रदेश येथील बोरगाव जिल्हा खंडवा येथील संजय महिकाल देवळे व त्याची पत्नी पिंकाबाई संजय देवळे हे जोडपं एक वर्षापासून सालगडी म्हणून काम करत.दरम्यान मंगळवार दिनांक 20 रोजी रात्री बिरोबाचा पुरा शिवारात गट क्रमांक 229 मधील पत्राच्या शेडमध्ये पिंकाबाई हिच्याजवळ पती संजय याने नवीन मोबाईल बघितला. तुला मोबाईल कोणी दिला? कोणाचा आहे? असं पती संजय याने पिंकाबाईला विचारले. तेव्हा पिंकाबाईने काहीच उत्तर न दिल्याने रागाच्या भरात संजयने मोबाईल चुलीत फेकून दिला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. संजयने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली, त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घरातच झोपून राहिला.दरम्यान दुसऱ्या दिवशी शेतीचा मालक अच्युत जाधव यांना दांपत्यामध्ये झालेल्या वादाची माहिती मिळाली. त्यांनी शेतात येऊन बघितले असता पिंकाबाई बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी संजय याला या बाबतीत विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी संजय देवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.