माओवाद्यांच्या संघटनेला आक्रमक बनवणारा चेहरा म्हणून त्याची ओळख होती. तो स्वत: स्फोटकतज्ज्ञ होता. बसवराजू १९७५ साली माओवादी विचारधारेच्या संपर्कात आला.माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीचा तसेच माओवाद्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख गंगण्णा उर्फ बसवराजू उर्फ नंबाला केशव याचा बुधवारी छत्तीसगडच्या सीमेत झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याच्या मृत्यूने माओवादी संघटना नेतृत्वहीन झाली आहे. पाचशेहून अधिक जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बसवराजूवर तब्बल सहा कोटींचे बक्षीस होते.
गुरिल्ला पद्धतीने सुरक्षा दलांवर हल्ले करण्याची पद्धत माओवादी संघटनेत बसवराजूने आणली. माओवाद्यांच्या संघटनेला आक्रमक बनवणारा चेहरा म्हणून त्याची ओळख होती. तो स्वत: स्फोटकतज्ज्ञ होता. बसवराजू १९७५ साली माओवादी विचारधारेच्या संपर्कात आला. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेठ येथील नंबाला केशव इंजिनीअरिंग करण्यासाठी तेलंगणमधील मोठे शैक्षणिक केंद्र असलेल्या वारंगल येथे आला. याच काळात कोंडापल्ली सीतारामय्या यांनी सुरू केलेल्या माओवादी विचारधारेच्या विद्यार्थी संघटनेशी त्याचा परिचय झाला. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य चेरकुरी राजकुमार याच्यासोबत बसवराजूने विद्यार्थी संघटनेत काम केले आहे. राजकुमार नंतर महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमेवर ठार झाला.










