मंकी कॅप घालून दरोडेखोर शिरले घरात, दोन वर्षाच्या मुलाला खेचलं आणि…; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना.

 छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात आलोक नगरमध्ये वीस मे रोजी रात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला. मंकी कॅप घातलेल्या दरोडेखोरांनी एका घरात घुसून बाप-लेकांच्या गळ्याला चाकू लावला. त्यांनी घरातील महिलांच्या अंगावरील सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने लुटले. सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंकी कॅप घालून आलेल्या दरोडे दरोडेखोरांनी बाप लेकांच्या गळ्याला चाकू लावून महिलांच्या अंगावरील एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडलीये. ही घटना सातारा परिसरातील आलोक नगर येथे वीस मे रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश बागुल पाटील यांच्या घराचे चैनल गेट तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.

हॉलमध्ये झोपलेले प्रवीण बागुल यांना कोयत्याचा धाक दाखवत दम दिला. मात्र, हॉलमधून कशाचा तरी आवाज येतोय म्हणून निलेश पाटील आले. यावेळी हॉलमध्ये मंकी कॅप घातलेल्या कोयता, कटोनी, चाकू यासारखे धारदार शस्त्र घेऊन आलेले दरोडेखोर दिसले. यावेळी दरोडेखोरांनी दोघा बाप लेकांच्या गळ्याला चाकू लावून पंधरा मिनिटांमध्ये घर आस्थाव्यस्त केलं.हा सगळा प्रकार बघून निलेश यांचा २ वर्षाचा मुलगा रडू लागला. यावेळी दरोडेखोरांनी निलेश यांच्या पत्नीला तो मुलगा आमच्या ताब्यात द्या असे सांगत मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी निलेश यांच्या पत्नीने मुलाला देणार नाही तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा असे सांगितले.

जवळी दरोडेखोरांनी कपाटातील रोख रक्कम व 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पळ काढला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथक तसेच ठसा तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र, पाऊस पडलेला असल्याने श्वानाला माग काढता आला नाही. दरम्यान शहरात सलग तीन दरोडे पडल्यानंतर पोलिसांसमोर या दरोडेखोरांना अटक करण्याचा आव्हान उभे राहिला आहे. या घटनेने लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.