नागपुरात विकृताचा कहर, श्वानाच्या डोक्यात लोखंडी सळी खुपसली, मुक्या जीवाची प्रकृती चिंताजनक.

डोक्यात सळाख खुपसलेला हा श्वान नरहरीनगर परिसरात एका घराशेजारी बसलेला काही लोकांना दिसला. त्यांनी सेव्ह स्पीचलेसच्या स्मिता मिरे यांना या घटनेची माहिती दिलीविकृत नराधमाने श्वानाच्या चक्क डोक्यात लोखंडी सळाख खुपसली. डोक्यात फसलेली ती सळाख घेऊन सैरावरा पळणाऱ्या या श्वानाला सेव्ह स्पीचलेस या संघटनेने ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करून सळाख काढण्यात आली असून, त्या श्वानाची प्रकृती चिंताजनक आहे.नागपूर येथील मानेवाडा-बेसा मार्गावरील नरहरीनगर येथे बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत आहे.डोक्यात सळाख खुपसलेला हा श्वान नरहरीनगर परिसरात एका घराशेजारी बसलेला काही लोकांना दिसला. त्यांनी सेव्ह स्पीचलेसच्या स्मिता मिरे यांना या घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात वेदनेने विव्हळत असलेला श्वान सैरावैरा पळू लागला. मिरे त्यांच्या सहकाऱ्यांसह परिसरात पोहोचल्या. श्वान तेव्हा शुभांगीनगर परिसरात होता.महत्प्रयासाने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर डॉ. आदित्य सिंह आणि डॉ. खुशबू आडे यांनी उपचार केले.

अडीच इंच आत गेलेली सळाख श्वानाच्या डोक्यातून काढण्यात आली. नंतर टाके लावण्यात आले. अत्यवस्थ असलेल्या श्वानावर तीन दिवस देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांत तक्रार देण्याची तयारी सुरू आहे.अलिकडेच सुगतनगर येथेही एका विकृताने श्वानाला बिस्कीट देण्याच्या बहाण्याने बोलवले, त्याला काठीने जोरदार मारहाण करीत त्याच्या पायाची हाडे मोडली होती. याबाबत पोलिस तक्रारही झाली होती. त्यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती. आठवडाभरातील श्वानांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.नागपुरातील मुक्या जिवाच्या डोक्यात लोखंडी सळाख खुपसणारा हा निर्दयी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्या नराधमाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाईची मागणी पोलिसांकडे करणार असल्याचे स्मिता मिरे व पशुप्रेमींनी सांगितले.

दुसरीकडे, गुंटूर (आंध्र प्रदेश) येथील स्वर्ण भारतीनगर येथे एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. रविवारी संध्याकाळी हा मुलगा त्याच्या घराजवळ खेळण्यासाठी बाहेर पडला तेव्हा ही घटना घडली. एका भटक्या कुत्र्याने त्याच्या मानेला चावा घेतला. त्याच्या मानेच्या शिरेला गंभीर दुखापत झाली.‘या भागात अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे होत नाहीत आणि येथील स्थानिक लोक आक्रमक आहेत. परिणामी, पालिका अधिकाऱ्यांना येथील भटक्या कुत्र्यांना स्थलांतरित करण्यात किंवा त्यांची नसबंदी करण्यात अडचणी येत आहेत,’ असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. कुत्र्याने मुलावर हल्ला केल्यानंतर, आजूबाजूच्या मुलांनी त्याला दगडफेक करून हाकलून लावले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.