धक्कादायक! महाराष्ट्रातले ११ आमदार बैठकीसाठी आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पैशांची जमवाजमव? मोठं घबाड सापडल्याने उडाली खळबळ.

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रूम नंबर 102 मध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली. माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपानंतर पोलिसांनी ही तपासणी केली. जालन्यातील आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे ही रूम बुक होती.अजय गर्दे, धुळे: धुळ्यातील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये मोठं घबाड सापडलं असून रुम नंबर 102 मधून तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात बुधवारी दाखल झालं होतं. धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती. शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर विकासकामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने शासकीय कार्यालयांमधून या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांकडून सदर रूमची तपासणी करण्यात आल्यानंतर कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर 102 ची तपासणी करण्यात यावी, या मागणीसाठी अनिल गोटे यांनी 3 ते 4 तास कुलूपबंद रूमबाहेर ठिय्या मांडला होता. दरम्यान जालनाच्या आमदारांच्या स्वीय सहायकाच्या नावानं बुक असलेल्या रूममध्ये कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयांमधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाने शासकीय विश्रामगृहातील 102 क्रमांचा रूमचे कुलूप तोडून तपासणी केली. या रूममध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपये इतकी रोकड आढळून आली आहे.जवळपास 3 मशीनद्वारे रात्रीपासून पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते. रात्रभर शासकीय विश्रामगृहाबाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली.

इतके पैसे नेमके कुठून आले, कोणी दिले याबाबत आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. पहाटे ४ वाजता ही कारवाई पूर्ण करण्यात आली असून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. या कारवाईची माहिती मिळताच दौऱ्यासाठी आलेली अकरा आमदारांची समिती ही रात्रीतून जिल्ह्याच्या बाहेर निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईनंतर संबंधित समितीवर राज्य सरकार काय कारवाई करणार हे देखील बघणे महत्त्वाचे असणार आहे.धुळ्यात आलेल्या समितीमधील 11 आमदार यांची नावे…समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर, समिती सदस्य आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अव्वर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.