भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या अन्…, रायगडात मोठा अनर्थ टळला .

रायगडातील महाड-विन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटींमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दोन्ही बसमधील दोन चालक व एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.रायगडातील महाड-विन्हेरे मार्गावर कुरले गावाजवळ दोन एसटींमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फौजी-अंबवडे-पुणे व महाड- फौजी-आंबवडे या दोन बस समोरासमोर येऊन धडकल्या आणि अपघात घडला. दोन बसमधील दोन चालक व एक वाहक व नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.महाड-दापोली या मार्गावर आठवडाभरात सात अपघात झाले आहेत. आज झालेल्या एसटीच्या अपघातात देखील प्रवासी जखमी झाले आहेत. तीव्र उतार आणि डांबरी गुळगुळीत रस्ता त्यात अवकाळी पावसाचा मारा यात वाहने घसरून एकमेकांवर आदळल्याने अपघात घडत आहेत. मागील आठ दिवसांत या मार्गावर एसटीचे दोन तर इतर वाहनांचे असे एकूण सात अपघात झाले आहेत.

फौजी आंबोडे गावातून दुपारी तीन वाजता सुटणारी फौजी-अंबवडे-पुणे व महाड आगारातून दुपारी चार वाजता सुटणारी महाड-फौजी-अंबवडे या दोन बस पुरले गावाजवळ रस्त्यावर समोरासमोर आल्या.त्यावेळी पडणाऱ्या पावसामुळे हा रस्ता निसरडा व गुळगुळीत झाल्याने या बसेसचा अपघात घडला आहे.महाड-दापोली मार्गावर आठवडाभरामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने पडलेल्या पाण्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. गुळगुळीत रस्ता असल्याने वाहन चालकांचा वेग देखील अधिक असल्याने वाहने नियंत्रणात आणणे कठीण जात आहे. यामुळे हे अपघात होत असल्याचे गिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी माहिती दिली आहे.महाड दापोली राज्य मार्गावर अपघात स्थळावर स्पीड ब्रेकर टाकण्याच्या नव्या प्रयोगामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर व त्यावर घाईघाईने मारलेले पांढरे पट्टे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने नेमका स्पीड ब्रेकर कुठे आहे हे नवीन वाहन चालकांना कळत नसल्याने या स्पीडब्रेकरमुळे पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची शक्यता वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.

गतीरोधक असल्याचे सूचनाफलक लावले नसल्याने पावसामध्ये डांबरावरील हे गतिरोधक दिसून येत नाहीत. यामुळे अपघातांची मालिका सुरूच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.स्नेहा दिनकर पार्टे (वय वर्ष 50 पुणे पांगाती ), नंदा दिनकर पार्टे ( पांगाती),साक्षी दिनकर पार्टे(पांगाती),सुवर्णा सहदेव शिंदे)वय वर्ष 50 पुणे वडगाव), दर्पणा सुभाष झेंडे (वाहक निगडी पुणे )विमल पांडुरंग भिलारे (पोलादपूर) यशवंत भिगाजी रेणुसे (ठाणे) संगीता दत्ताराम पवार(नवे नगर) दत्तराम सोनू पवार (नवे नगर) शेखर पोपट पिसाळ(वाई, सातारा चालक) निवत दादा राम सातव (चालक सुलतानपूर अकोला) मेघना मुकेश सकपाल (पोलादपूर) यांच्यासहित बारा जण जखमी झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.