सांगलीत भयंकर घटना, गुंगीचं ड्रिंक पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक.

सांगलीत भयंकर घटना घडली आहे. भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.सांगलीत महाराष्ट्राला कामिळा फासणारी घटना घडली आहे. सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाली करत तीन तरुणांना अटक केली आहे. यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित तरुण त्यांचा मित्र आहे.विनय विश्वेष पाटील (यय २२, रा. महीपती निवास अंतरोळीकर नगर भाग १ सोलापुर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय२०, रा. एफ ६०५,

सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय २१, रा. ३०३ कासाली व्हिया अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणी आणि संशयित पाटील, गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत. पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले.रुमवर गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजले तसेच तेही दारू प्यायले. त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले.

त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तीनही संशयितांना अटक केली.विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांकडून या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.