मुंबई इंडियन्सने कोणत्या दोन षटकांत सामना आपल्या बाजूने सामना फिरवला, जाणून घ्या…

नाद कोणाचाही करा पण मुंबई इंडियन्सचा का नाही, हे पुन्हा एकदा वानखेडेच्या मैदानात पाहायला मिळाले. दोन षटकांत सामना मुंबईच्या बाजूने कसा काय फिरला, जाणून घ्या…मुंबई : वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा नाद करायचा नाय, ही गोष्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादवने संथ खेळपट्टीवर धडाकेबाज फटकेबाजी केली. सूर्याच्या नाबाद ७३ धावांच्या खेळीवर मुंबईच्या संघाला १८० धावांचा डोंगर उभारता आला होता. दिल्लीचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा. पण मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आणि ५९ धावांनी दणदणीत विजय साकारला.वानखेडेची खेळपट्टी संथ होत चालली होती. त्यामुळे रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या नामांकित फलंदाजांना जास्त धावा करता आल्या नाहीत. हे तिघेही अपयशी ठरले असले तरी सूर्याने मात्र धमाकेदार फटकेबाजी केली. सूर्याने खेळपट्टीवर सेट होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरला.

सूर्याने सुरुवातीला आपले अर्धशतक झळकावले आणि अखेरच्या दोन षटकांत त्याने नमन धीरच्या साथीने दिल्लीच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. सूर्या आणि नमन यांनी अखेरच्या दोन षटकांत ४८ धावांचा पाऊस पाडला. या अखेरच्या दोन षटकांत मुंबईच्या बाजूने सामना मुंबईच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. सूर्याने यावेळी ४३ चेंडूंत ७ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७३ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. नमन धीर यावेळी चांगलाच आक्रमक फलंदाजी करत होता. नमनने यावेळी फक्त ८ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद २४ धावांची खेळी केली. त्यामुळेच मुंबईच्या संघाला १८० धावा करता आल्या.

दिल्ली संघ हा फलंदाजीसाठी उतरला खरा, पण मुंबईच्या गोलंदाजांनी यावेळी त्यांना आपल्या तालावर नाचवले. दुसऱ्या षटकात मुंबईने फॅफ ड्यु प्लेसिसला ६ धावा करता आल्या. केएल राहुलला ११ धावांवर यावेळी समाधान मानावे लागले. हे दोघे बाद झाले आणि त्यावेळीच दिल्लीचा संघ पराभूत होईल, हे जवळपास स्पष्टच झाले होते. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यानंतर तिखट मारा केला आणि त्यापुढो दिल्लीच्या ंसघाचा निभाव लागला नाही. त्यामुळेच मुंबईच्या संघाला यावेळी दमदार विजय मिळवता आला.दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. कारण जो संघ जिंकेल त्यांना प्ले ऑफमध्ये आपेल स्थान भक्कम करण्याची संधी होती. यामध्ये मुंबईचा संघ यशस्वी ठरला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.