गजानन मारणेने जामीन मिळण्यासाठी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या गुन्ह्यात ‘मकोका’चे कलम लागू होत नसल्याचं म्हटलं होतं. कोथरूडमधील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार- मकोका- दाखल गुन्ह्यात मुख्य आरोपी गजा मारणेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे नमूद करत विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला. दरम्यान, या प्रकरणी गजा मारणे, रूपेश मारणेसह एकूण दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.कोथरूडमधील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील सराईतांनी देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती. त्याची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर, सर्व रा.










