काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून ९८८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणात केला आहे.संरक्षण, निवडणुकीत उमेदवारी आणि पक्षात पदे मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून ९८८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणात केला आहे.या प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आरोपी आहेत. या प्रकरणावर आता २ जुलैपासून सुनावणी सुरू होणार आहे. ‘ईडी’ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात विविध माध्यमांतून ९८८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.










