दुबईतील ‘गल्फ फर्स्ट कमर्शियल ब्रोकर्स’ नावाची ब्रोकरेज फर्म एका रात्रीत गायब झाली आणि गुंतवणूकदारांचे लाखो दिरहम घेऊन गेली. या फर्मने अनेक भारतीयांसह गुंतवणूकदारांना परकीय चलनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. केरळमधील अनेक स्थलांतरितांनीही या कंपनीत मोठी गुंतवणूक केली.संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील दुबई-स्थित ‘गल्फ फर्स्ट कमर्शियल ब्रोकर्स’ नावाची ब्रोकरेज फर्म गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन रातोरात पसार झाली आहे. ही फर्म गुंतवणूकदारांचे लाखो दिरहम घेऊन पसार झाली असून गेल्या महिन्यापर्यंत दुबईच्या बिझनेस बे येथील कॅपिटल गोल्डन टॉवरमध्ये या फर्मची दोन कार्यालये होती. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, येथून सुमारे 40 कर्मचारी सतत गुंतवणूकदारांना फॉरेक्स ऑफरसाठी कॉल करत होते.या घटनेमुळे विशेषतः भारतीय प्रवासी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे ज्यांनी या कंपनीत आयुष्यभराच्या बचतीची गुंतवणूक केली होती. आता दुबईच्या बिझनेस बे येथील कॅपिटल गोल्डन टॉवरच्या सूट्स 302 आणि 305 मध्ये फक्त धूळ, तुटलेल्या टेलिफोन लाईन्स आणि कंपनीच्या अचानक गायब होण्याचे मूक साक्षीदार असलेली काळ्या कचऱ्याची पिशवी उरली आहे.










