‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आल्यात म्हणूनच…’ भुजबळांच्या कमबॅकवर रोहित पवारांची खोचक टीका.

आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांना आणि भारतीय जनता पार्टीला टोला लगावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ओबीसींसाठी जबरदस्त खेळी केली आहे, असे रोहित पवार म्हणाले.आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) आणि भारतीय जनता पार्टीवर खोचक टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ओबीसींसाठी जबरदस्त खेळी केली आहे. छगन भुजबळांना विना पदाचं ठेवणं शोभत नव्हतं, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी भाजप अन् भुजबळांना टोला लगावला आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया समोर येत आहेत. आमदार रोहित पवारांनी बुधवारी सोलापुरात असताना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस २०१४ साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. राज्यात भाजपची सत्ता असताना छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. आता छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री पदावर आहेत, कालच त्यांचा शपथविधी पार पडला.राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपमधील अनेक लोक नाराज आहेत. ज्यांनी भाजपला वाढवण्यासाठी आयुष्य घालवलं, भाजपमधील नेत्यांना भाजपनेच डावलले, त्यामुळे भाजपमधील नेते कार्यकर्ते पदाधिकारी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत, असेही आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ओबीसींचे राजकीय नेतृत्व आहेत. त्यांनी २० मे ला मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते नवव्या वेळी मंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाल्याने मुंडेंनी मंत्रीपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एक मंत्रीपद रिक्त झाले होते. त्याजागी आता छगन भुजबळांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मुंडेंना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच काल रात्री उशिरा अजित पवार हे धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्यावर गेल्याची माहिती माहिती समोर आली. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचीही माहिती आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.