पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय बंद होणार? सूचना देऊनही सुधारणा नाही, ‘एनएमसी’ची पालिकेला नोटीस.

महापालिकेने चार वर्षांपूर्वी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. परंतु, चार वर्षानंतरही या महाविद्यालयाला पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. या महाविद्यालयाच्या माध्यमातून गेले तीन वर्षे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप डॉ. धेंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन देऊन, तातडीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजातील त्रुटी दूर करण्यासाठी सूचना देऊनही त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने महाविद्यालय बंद का करू नये? आणि त्रुटींसाठी एक कोटी रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशा कठोर शब्दांत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पुणे महापालिकेला नोटीस बजावल्याचा दावा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी केला.

महाविद्यालयासाठी अद्याप स्वतंत्र इमारत नाही, महाविद्यालयाच्या आकृतीबंधाला मान्यता नाही, प्राध्यापकांची कमतरता आहे यासारख्या अनेक त्रुटी दूर करण्याची सूचना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महापालिकेला यापूर्वी अनेकदा दिली होती. तरीही, यातील कोणत्याच त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या नसल्याचा दावा डॉ. धेंडे यांनी केला. महापालिकेने चार वर्षांपूर्वी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. परंतु, चार वर्षानंतरही या महाविद्यालयाला पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. या महाविद्यालयाच्या माध्यमातून गेले तीन वर्षे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप डॉ. धेंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन देऊन, तातडीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.’महापालिकेने नायडू हॉस्पिटलच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. ‘एनएमसी’ने महाविद्यालय सुरू करण्यासाठी मान्यता देण्यापूर्वी प्रशासनाने ठरावीक कालमर्यादेत आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची अट घातली होती. मात्र, अद्यापही आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याने महाविद्यालयाला नोटीस पाठविली आहे. प्रत्येक त्रुटीसाठी एक कोटी रुपये दंड आकारण्यात येईल, असेही नोटिशीत म्हटले आहे. पालिकेने महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ६५० कोटी रुपये दिले आहेत. बांधकामासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. सुविधा नसल्याने विद्यार्थी तक्रार करीत आहेत,’ असे डॉ. धेंडे म्हणाले.महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नाही, पुरेसे प्राध्यापक नाहीत ,विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शिकण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये जावे लागतकर्मचाऱ्यांचा आकृतीबंधही मान्य झालेला नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.