जरा थांबवा बाजूला… नवऱ्याच्या बाईकवरुन उतरली अन् 20 वर्षीय विवाहितेने थेट विहीर जवळ केली!

नवऱ्याच्या दुचाकीवरून उतरून बायकोने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.दुचाकीस्वार पती-पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विरावली गावाजवळ पत्नीने पतीला दुचाकी थांबवायला सांगितली आणि तिने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे, मात्र पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी पतीनेच तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केला आहेजळगाव जिल्ह्यातील महेलखेडी येथील मुस्कान अल्ताफ तडवी, वय 20 वर्ष, ही दुचाकीने पती अल्ताफ रहमान तडवी, राहणार महेलखेडी, याच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान विरवली गावाजवळ शेत गट क्रमांक 57 येथे तिने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगितले.दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरडा केला, नागरिकांनी धाव घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढले. महिलेला वर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या विसाव्या वर्षी विवाहित महिलेने नेमकी आत्महत्या का केली असावी हे मात्र कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीपतीने तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.दुसरीकडे, मद्यधुंद युवक त्रास देत असल्याने त्याची तिघांनी दगडाने ठेचून हत्या केली. नंतर स्वत: राजापेठ पोलिस ठाण्यात जावून हत्येची कबुली दिल्याची घटना मंगळवारी घडली. खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातकुली मार्गावर एका २० ते २२ वषींय युवकाचा मृतदेह एका शेतात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृताची ओळख पटविली जात असतानाच तो राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.दरम्यान, सागर अडायके, विकी सरकटे आणि निलेश सावरकर यांनी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण करून भातकुली मार्गावर एका युवकाच्या हत्येची कबुली दिली. मात्र त्याला ओळखत नसल्याचेही सांगितले. यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. या प्रकरणात आणखी दोन युवक फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.