ऑनलाइन गेमचं व्यसन ठरलं जीवघेणं, आर्थिक अडचणीत अडकलेल्या तरूणानं उचललं टोकाचं पाऊल.

नागपुरातील एका युवकाने ऑनलाइन गेमच्या नादापायी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे निर्माण झालेल्या ताणतणावामुळे त्याने टोकाचे पाऊल उचचले आहे.स्मार्टफोनवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सचं वाढतं व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींचा भीषण परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. नागपूर शहरातील कामठी परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय युवकाने आर्थिक ताणतणावामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेलेल्या अनिकेत गणेश ढबाळे या युवकाने विषारी पदार्थ प्राशन करून जीवन संपवलं.अनिकेत हा आयटीआयमध्ये फिटर ट्रेडचा विद्यार्थी होता. शिक्षणासोबतच तो कामठी शहरातील एका नामांकित बेकरीमध्ये काम करत होता.

त्याला मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सचं प्रचंड आकर्षण होतं. सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी म्हणून खेळणारा अनिकेत हळूहळू गेमच्या आहारी गेला आणि त्याचं व्यसनात रूपांतर झालं.खेळांमध्ये जिंकण्यासाठी त्याने ऑनलाइन पेमेंटद्वारे पैसे लावायला सुरुवात केली. सुरुवातीला लहान रक्कम असलेली ही गुंतवणूक हळूहळू मोठ्या कर्जात बदलली. काही गेम्समध्ये हरल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला. आर्थिक ताणतणावामुळे अनिकेत मानसिकरित्या खचला होता. घरच्यांशी तो फारसा बोलत नव्हता आणि सतत गप्प राहायचा, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.15 मे रोजी अनिकेतने आपल्या राहत्या घरी विषारी उंदीरनाशक प्राशन केले. कुटुंबीयांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे त्याला तातडीने नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पाच दिवसांनंतर म्हणजेच 20 मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जुने कामठी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अनिकेतच्या पश्चात त्याची आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. अनिकेत कुटुंबाचा आधार होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना फक्त एक दुर्दैवी मृत्यू न राहता, सध्या तरुणांमध्ये वाढत असलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनावर प्रकाश टाकणारी आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.