मोठी बातमी- पुणे स्टेशनसह भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू.

 पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.पुणे: पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला आहे. धमकीच्या या फोनने खळबळ उडाली असून पुणे पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसरासह विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली. पुण्यातील बंड गार्डन पोलीस आणि सीआरपीएफ रेल्वे पोलीस यांनी शोध मोहीम राबवली असता रेल्वे स्थानक परिसरात कसल्याही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर आज सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. “पुणे रेल्वे स्थानक, येरवडा आणि भोसरी या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्यात येणार आहे,” अशी धमकी या फोनवरून देण्यात आली. त्यानंतर याबाबत बंड गार्डनर पोलीस स्थानकाला माहिती कळवण्यात आली. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध घेण्यात आला असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.राज्यातील विविध शहरांत मागील काही आठवड्यांत बॉम्बस्फोट घडवण्याचे धमकी देणारे अनेक फोन करण्यात आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. ससून हॉस्पिटलमध्ये काम करत असणाऱ्या एका डॉक्टरच्या मोबाईलवर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मेसेजद्वारे आली होती.पोलिसांनी या धमकीची गंभीरपणे दखल घेतली. पोलिसांनी ससून रुग्णालयाचा संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली, पण कुठेच काही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.