धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काय घडलं.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. रिक्त असलेली मंत्रिपदाची जागा भरल्याने धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नेल्याची माहिती आहे.मुंबई: ओबीसींचा राजकीय चेहरा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. १९९१ पासून मंत्री म्हणून शपथ घेण्याची भुजबळ यांची आजची नववी वेळ आहे. ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग अवघड बनला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच काल रात्री उशिरा अजित पवार हे धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्यावर गेल्याची माहिती माहिती समोर आली आहे.छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे धनंजय मुंडे हे सरकारच्या या टर्ममध्ये तरी मंत्रिमंडळात पुन्हा येऊ शकतील की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग आढळून आल्याने निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदावरून दूर व्हावं लागलं होतं.

परंतु वातावरण निवळल्यानंतर पुन्हा आपले कमबॅक होईल, अशी आशा मुंडे यांना होती. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता छगन भुजबळ यांना संधी देण्यात आल्याने राष्ट्रवादीचा मंत्रि‍पदाचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुंडे यांच्या परतीचा मार्ग आणखीनच खडतर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांची समजूत काढण्यासाठी आणि त्यांना राजकीय भवितव्याविषयी आश्वस्त करण्यासाठी अजित पवार हे मुंडे यांना घेऊन काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेल्याचे समजते. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करत त्यांच्या पुनर्वसनाविषयी शब्द दिला असण्याची शक्यता आहे. याबाबत एका मराठी दैनिकाने वृत्त दिले आहे.महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलल्यानंतर पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच अंगावर घेणाऱ्या छगन भुजबळांना अखेर सबुरी सल्ला पावला आहे.

भुजबळांचे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळात जोरदार कमबॅक केले आहे. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे नाशिकने मंत्रिमंडळात चौकार मारला आहे. भुजबळांची राजकीय कारकीर्द संपल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांनाही भुजबळांनी चपराक लगावली.आक्रमक आणि ओबीसी नेता अशी ओळख असलेल्या भुजबळाच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच चांगली कामगिरी करील, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भुजबळांनी थेट राष्ट्रवादी सोडण्याची तयारीही केली होती; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांनी भुजबळांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यामुळे भुजबळांनीही हा सल्ला शिरसावंद्य मानून झाले गेले विसरून जाऊन ‘राष्ट्रवादी’त शांत राहण्याचे धोरण स्वीकारले. भुजबळांच्या या सबुरीच्या धोरणाला सहा महिन्यानंतर फळ आले आहे. बीडमधील धनंजय देशमुख हत्याप्रकरणात राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर अखेर भुजबळांची वर्णी लागली आहे.दरम्यान, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असून, त्यांना तीन मंत्रिपदे आहेत, तर शिंदे गटाचे दोन आमदार असून एक मंत्रिपद आहे. परंतु, भाजपचे पाच आमदार असताना भाजपच्या वाटेला एकही मंत्रिपद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.