चल तुला घरी सोडतो, कोकणात साठीच्या म्हाताऱ्याने शाळकरी मुलीला बाईकवर बसवलं, अर्ध्या वाटेतच…

शाळा सुटल्यानंतर मुलगी एस.टी. स्टॅण्ड परिसरात उभी होती. त्यावेळी अलिम कर्जिकरने “तुला घरी सोडतो” असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवले.रोहा तालुक्यात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. 60 वर्षीय वृद्धाने शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत धावत्या बाईकवरुन उडी मारली आणि तिची सुटका झाली. अलिम आयुब कर्जिकर असे आरोपी वृद्धाचे नाव आहे. त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून चालत्या दुचाकीवरुन उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. या घटनेत ती किरकोळ जखमी झाली आहे.

या प्रकरणाने रायगड जिल्ह्यातील रोहा परिसरात खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर मुलगी रोहा एस.टी. स्टॅण्ड परिसरात उभी होती. त्यावेळी अलिम कर्जिकरने “तुला घरी सोडतो” असे सांगत आपल्या दुचाकीवर बसवले. चनेरा स्टॉपवर सोडण्याचे आश्वासन देत तो तिला घेऊन निघाला.प्रवासादरम्यान त्याने मुलीला चॉकलेट दिले, ज्यामुळे तिला संशय आला व तिने स्वतःच्या बचावासाठी चालत्या दुचाकीवरून उडी मारून आरडाओरड केला. स्थानिकांनी तातडीने धाव घेत अलिमला पकडून त्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अलिम कर्जिकर याला ताब्यात घेतले.

त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस करत आहे.रायगड जिल्ह्यात महिलांविरोधातील घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुली आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “जोपर्यंत अशा प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.रोह्यातील या घटनेत मुलीने दाखवलेले प्रसंगावधान आणि धैर्य यामुळे ती मोठ्या संकटातून बचावली. तिच्या सावधपणामुळे आरोपीच्या कृत्याला वेळीच आळा बसला. दरम्यान रोहा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.