कुणाचं कुंकू गेलं, कुणाची पोरं, कल्याण इमारत दुर्घटनेत सारं गमावलं; चिमुकलीला ढिगाऱ्याबाहेर काढताच आईचा टाहो.

वरच्या मजल्याचर राहणाऱ्या रहिचाशांचे मृतदेह बाहेर काढले जात असताना ज्योती यानी अक्षरशा: टाहो फोडला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या संसाराची राखरांगोळी झालेली पाहताना त्याना प्रचंड वेदना होत होत्या.सप्तशृंगी इमारतीच्या एका बाजूचा चारही माळ्याचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत तळमजल्यावरील क्षीरसागर कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी असे चौकोनी कुटुंब असून वडील कामावर गेल्यानंतर आई ज्योती बरोबर मुलगी ऋतुजा आणि मुलगा यश असे तिघेजण घरात होते. तिघेजण उठून स्वयंपाक घरात निघाले. यश मागेच होता. इतक्यात डोक्यावरून किंकाळ्या आणि जोराचा आवाज एकू येताच ते तिघेही बाहेर पळाले. यामुळे थोडक्यात त्यांचा जीव वाचला. तळ मजला असल्याने त्यांना घराबाहेर पळणे सोपे झाल्याने आपण वाचल्याचे ज्योती म्हणाल्या. यशला सायंकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

दुसऱ्या मजल्यावर राहणारे श्रीकांत शेलार पत्नी, दोन वर्षाची मुलगी नमस्वी आणि मुलगा श्रावील यांच्यावरोबर राहत होते. दुर्घटना घडली तेव्हा चौघेही घरातच होते. हॉलमध्ये बहीण- भाऊ खेळत होते. इतक्यात त्यांच्या सुखी संसारावर कालाने घाला घातला. मुलांना वाचविण्यासाठी मलब्याच्या दिशेने आई वडिलांनी धाव घेतली, मात्र, या ढिगाऱ्यात काहीच नजरेस पडत नसल्याने त्यांनी एकच टाहो फोडला. शेजाऱ्यांनी त्यांना कसेबसे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मलब्यातून कोणाला बाहेर काढले जाते हेच कळत नसल्याने ते हवालदिल झाले होते. पोलिसांनी त्या दोघांना रोखून धरले होते.श्रावीलला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच आईचा जीव भांडयात पडला.

मात्र, चिमुकली कधी सापडेल तो सुरक्षित असेल ना हे पाहण्यासाठी त्या माउलीची धडपड सुरू होती. बचाव पथकाने मुलीचा मृतदेह बाहेर काढताच ती नमस्वी असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. वडिलांनी मुलीच्या मृतदेहाकडे धाव घेतली. आईने हंबरडा फोडला. रुग्णालयात मुलीचा निष्प्राण देह पातून आई निपचित कोपऱ्यात शून्य नजरेने पाहत होती. आपली मुलगी आपल्याला परत कधीच दिसणार नाही, या विचारानेच ती व्याकूळ झाली होती. तिचे सांत्वन करण्यासाठीदेखील कोणी नव्हते. तर वडिलांनी थेट खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलाच्या दिशेने धाव घेतली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.