मुसळधार पावसाचा कहर, पुणेकरांच्या जीवाला घोर; प्रशासनाचा विकासकामांचा दावा ठरला फोल.

पुण्यात मुसळधार पावसामुळे पुणेकरांची धांदल उडाली आहे. येथे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.शहराच्या चारही दिशांना मंगळवारी सायंकाळनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सगळ्यांची दाणादाण उड़वून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची धांदल उडवली. हिंजवडी, बाणेर, बावधन परिसरांना पावसाने सर्वाधिक झोड़पले. सिंहगड़ रस्ता, सातारा रस्ता, आंबेगाव (मुंबई-बेंगळुरू महामार्ग) येथे वाहनांच्या रांगा लागल्या, काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्या, वादळामुळे ३० ठिकाणी झाडे पडली, तर धनकवडी परिसरात सीमा भिंत कोसळली. महापालिकेच्या पावसाळापूर्व विकासकामांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र शहरात दिसले.शहरात मंगळवारी (20 मे) दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली होती, त्यानंतर अवध्या अर्ध्या तासात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. शहराच्या चारही दिशांना पाऊस कोसळला.

हिंजवडी परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर सगळीकडेच गुडमाभर पाणी वाहत होते. सायंकाळची वेळ असल्याने हिंजवडीतील आयटी इंजिनीअर्स मोठ्या संख्येने घरी जाण्यासाली बाहेर पडले होते. त्यामुळे मुंबई- बेंगळुरू महामार्गावर हिंजवडीपासून आंबेगावपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व्हिस लेनवरूनही पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडथळे येत होते.येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव आणि नगर रस्ता परिसराला मंगळवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. नगर महामार्गाचर अनेक ठिकाणी दोन फुटापर्यत पाणी साचल्याने नदीचे स्वरूप आले होते. येरवडा, वडगाव शेरी, धानोरी, चंदननगर, विश्रांतवाडी, कळस भागांतील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.

हिंजवडी, चाणेर, बावधन, गुंजन चौक, मित्रमंडळ चौक, सुखसागरनगर,बिबवेवाडी, कात्रज चौक, वारजे रस्ता, गांधी भवन, कोथरुड, बाणेर-बावधन, लोहगाव विमानतळाचं नवं टर्मिनलसमोर.शहरात पावसाचा जोर वाढल्यानंतर येणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी महापलिकेचे अधिकारी, कर्मचारी पावसात प्रत्येक ठिकाणी पोहोचत होते, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तुंबणार नाहीत, यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात येत होती. मांगीरबाबा चौकात मोठा खड्डा पडल्याने तेथे बॅरिकेडिंग करण्यात आले होते. धानोरी (लक्ष्मीनगर), लुल्लानगर चौकातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.