सांगलीत उधारीच्या पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना काहीच तासात अटक केली. मात्र, आपल्या मुलाने कोणाची हत्या केल्याचं कळताच आईनेही आपला जीव दिला आहे.उसनवार दिलेल्या पैशाची मागणी करत असलेला राग मनात धरून कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. अवघ्या आठ तासातच कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. दरम्यान, आरोपी मुलगा सुशांत शेजुळ याने केलेल्या खूनाचा धक्का सहन न झाल्याने आरोपीची आई विमल शंकर शेजुळ यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
खून करणाऱ्या सुशांत शेजुळ आणि स्वप्निल क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (18 मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अजित क्षीरसागर हे दुकान साहित्य आणण्यासाठी घरातून निघाले होते. रात्री उशीर झाला तरी ते परत आले नाहीत. घरातील सदस्यांनी त्यांची इतरत्र शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.मंगळवारी (20 मे) दुपारी गावातील मारुती कारंडे हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी घरातील सदस्यांनी जाऊन पाहणी केली असता क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले होते.रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी व जखमी बसले होते. सुशांत शेजुळ यास उसनवार दिलेले 2 हजार रुपये परत मागितले.









