‘ई-बाइक टॅक्सी’ विरोधात एल्गार, अंधेरी RTO कार्यालयावर आज रिक्षाचालकांचा मोर्चा.

 ई-बाइक टॅक्सी/बाइक पुलिंगला दिलेली मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार असून लाखो रिक्षाचालक यात सहभागी होतील, असे सांगण्यात आले.राज्य सरकारने बाइक टॅक्सीला मुभा दिली आहे. मात्र यामुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार असल्याचा दावा करत ही परवानगी रद्द करावी, या मागणीसाठी रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. त्यासाठी आज, बुधवारी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनच्या वतीने अंधेरी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार देण्याच्या नावाखाली ई-बाइक टॅक्सी मंजूर केली आहे. ई-बाईक टॅक्सी सुरू कराव्यात की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीसमोर आमच्या युनियनने विरोध केला होता आणि त्याला विरोध करण्याचे कारणही दिले होते,’ असे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. ई-बाइक टॅक्सी/बाइक पुलिंग सुरू झाल्यामुळे १५ लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येणार आहे.

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश शहर आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व ऑटोरिक्षा संघटनांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ई-बाइक टॅक्सीला दिलेली मान्यता रद्द करण्याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता. ई-बाइक टॅक्सी/बाइक पुलिंगला दिलेली मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार असून लाखो रिक्षाचालक यात सहभागी होतील, असे सांगण्यात आले.ई-बाइक टॅक्सी मंजूर करण्यापूर्वी राज्य सरकारने युनियनशी चर्चा करणे आवश्यक होते, मात्र सरकारने एकतर्फी निर्णय घेत या ई-बाइक टॅक्सीला मान्यता दिली आहे. याचा निषेध करून आज, बुधवारी अंधेरी आरटीओवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाराणसी महानगरी एक्स्प्रेसमधील वातानुकूलित बी-१ डब्याला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. महानगरी एक्स्प्रेस देखभालीसाठी वाडीबंदर यार्डमध्ये उभी होती. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे आणि अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. यात कोणताही जिवितहानी झाली नाही, मात्र बी-१ आणि बी-२ डब्यांचे प्रचंड नुकसान झाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.