बाईक चालवताना कोणी फोनवर बोलणारे दिसले, तर त्यांना शिव्या देऊ नका, सॅल्युट मारा! अभिनेत्याकडून कानउघडणी.

अभिनेते स्वप्नील राजशेखर बरेचदा वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांचे कान टोचले आहेत.मुंबई- अनेकदा लोक आपला जीव धोक्यात घालून कशीही वाहनं चालवत असतात. बरेचदा नागरिकांकडून रहदारीच्या नियमांचे भंग केले जातात. त्यामुळे त्याच्या जीवासह इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होतो याची त्यांना जाणीव नसते. रस्त्यावर काहीजण गाडी चालवताना फोनवर बोलत जातात अशावेळी तोल जाण्याची शक्यता असते. तोल गेल्यावर मागून येणाऱ्या गाड्यांमुळे मोठा अपाघात होऊ शकतो याची त्यांना बिलकुल फिकिर नसते.रस्त्यावर गाडी चालवताना बेफिरपणे फोनवर बोलणाऱ्या माणसांच्या संदर्भात तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अभिनेत्याने एक टोमणे मारणारा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी व्हिडिओ शेअर करुन ही माणसं देशासाठी फार महत्वाची असल्याचं म्हणत कान टोचले आहेत.

व्हिडिओत अभिनेते स्वप्निल राजशेखर म्हणाले की, ही जी चालत्या टू व्हीलर वरून एका कानाला फोन लावून गाडी चालवणारी माणसं असतात ती साधीसुधी माणसं नसतात. तुम्ही त्यांना सामान्य माणसं समजू नका ती खूप महत्त्वाची माणस आहेत. त्यांच्यावर खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत असं मला वाटतं. आपल्या देशाची सुरक्षा जवळपास यांच्याच हातात आहे. आपले अँटी टेरिरिझम स्कॉड आहेत ना त्यांचे स्लीपर सुद्धा यांना फोन करतात.आपल्या देशात शत्रू राष्ट्राच्या कुठे कुठे विघातक कारवाया चालू आहेत , कुठे अतिरेकी कारवाया करायचं त्यांच प्लॅनिंग चालू आहे या सगळ्याची ही माणसं माहिती काढतात. त्याची माहिती लागली की ते लगेच टू व्हीलर वर असतील तरीही पीएम ऑफिसला फोन लावतात. यांच्याकडून थेट पंतप्रधानांकडे माहिती जाते.

ही ही माहिती आम्हाला मिळाली आहे आणि इथे बॉम्ब फुटणार आहे. यांनी दिलेल्या माहितीनंतर तो बॉम्ब रिकामी केला जातो. त्यांच्याकडे बाजूला उभं राहून बोलावं एवढा सुद्धा वेळ नसतो. बॉम्ब फुटला तर करायचं काय त्यामुळे ही माणसं चालत्या गाडीवरून बोलत जातात.स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. एवढी रिक्स ते आपल्यासाठी घेतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळे चालता गाडीवर एका कानाला फोन लावून जाणारी माणसं दिसली तर त्यांच्यावर चिडू नका. त्यांना शिव्या घालू नका सेल्युट करा.स्वप्नील राजशेअर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत पाहायला मिळत आहेत. यामध्ये त्यांनी अधिपतीच्या वडिलांची चोख भूमिका साकारलीय. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.