कोथरुडमधील दोन महिलांची ४४ लाखांची फसवणूक, शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून गंडवलं.

शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन महिलांची एकूण ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देतो,’ असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन महिलांची एकूण ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात या संदर्भात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत एका ५२ वर्षीय महिलेची ३३ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित महिलेला व्हॉट्सअॅपवर शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीबाबत लिंक पाठवून एका अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. भरघोस परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यात आले. काही काळाने सायबर चोरट्यांकडून संपर्क करणे बंद झाले. त्या वेळी महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळले.

त्यांनी पोलिसांत धाव घेत फसवणुकीची तक्रार दिली.दुसऱ्या घटनेत पौडरस्ता परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीसाठी लिंक व अॅप पाठवले गेले. ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळत असल्याचे सांगून त्यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपये उकळण्यात आले.दोन्ही प्रकरणांमध्ये व्हॉट्सअॅपवरील अज्ञात आरोपींनी विविध मोबाइल क्रमांकांद्वारे संपर्क साधून महिलांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग झाल्यानंतर संबंधितांचा संपर्क थांबला.

या प्रकरणी आयटी अॅक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, कोथरूड पोलिस तपास करीत आहेत.भोर तालुक्त्यातील पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी या गावाच्या हद्दीत एका दुकानासमोर कुलूप लावून उभी केलेली मोटारसायकल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश गोरख तालडे (वय ४०, सध्या रा. शिंदेवाडी, ता. भोर, मूळ रा. बोळेगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरो होंडा कंपनीची अॅक्टिवा ही मोटारसायकल फिर्यादीने एका दुकानासमोर उभी केली होती. चोरट्याने ती पळवून नेली. राजगड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.