सॉरी मम्मी, पप्पा, बायको… काविळीने लेकीचा बळी घेतला, शिक्षक पित्याने चिठ्ठी लिहिली, पायाला दगड बांधून आयुष्य संपवलं.

वर्षभरापूर्वी शिक्षकाच्या अवघ्या 14 वर्षीय मुलीचा काविळीच्या आजाराने मृत्यू झाला होता. लाडक्या लेकीचा मृत्यू झाल्याने पित्याला विरह सहन होत नव्हता.’माझी मुलगी सोनल हिच्या आठवणीत मी हे पाऊल उचलत आहे, कुणालाही दोषी धरु नये; मम्मी, पप्पा, बायको, गुड्डी, संध्या, आर्या आय एम व्हेरी सॉरी’ अशा आशयाचा मजकूर लिहून शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर येथे उघडकीस आली आहे. वर्षभरापूर्वी शिक्षकाच्या अवघ्या 14 वर्षीय मुलीचा काविळीच्या आजाराने मृत्यू झाला होता. लाडक्या लेकीचा मृत्यू झाल्याने पित्याला विरह सहन होत नव्हता. अखेर 47 वर्षीय शिक्षक पित्याने स्वतःच्या पायाला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दिनांक 20 मे रोजी करमाड येथे उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आली.

सुनील मिट्टू तारो, वय 47 वर्ष, रा. करमाड असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. सुनील तारो हे करमाळा येथील न्यू हायस्कूल शाळेमध्ये संगणक शिक्षक म्हणून कार्यरत होते. सुनील तारो हे करमाड येथे आई, वडील, पत्नी, एक मुलगी यांच्यासह राहत होते.सुनील यांच्या सोनल नावाच्या 14 वर्षीय मुलीला गेल्या वर्षी काविळीची लागण झाली होती. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरू असताना 21 जून 2024 रोजी सोनलची प्राणज्योत मालवली. लाडक्या लेकीचा मृत्यू झाल्यामुळे सुनील तारो हे तणावात होते.सोनल न्यू हायस्कूल शाळेमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती.

तिला अभिनय, सूत्रसंचालन करण्याची प्रचंड आवड होती. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात ती उत्साहाने सहभागी होत असे. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचे व्हिडिओ आहेत.दरम्यान. मंगळवार दिनांक 20 मे रोजी सुनील तारो हे फिरायला गेले होते. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांना कॉल करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पायाला भला मोठा दगड बांधून त्यांनी विहिरीत उडी घेतली.दगडामुळे काही क्षणात ते तळाला गेले. नागरिकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.