आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, त्यांचे गणेश नाईक यांच्याशी कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. त्यांचे कार्यकर्तेच वादाचे कारण आहेत. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील यांच्या नियुक्ती सोहळ्यात त्या बोलल्या. नाईक हे ज्येष्ठ नेते असून, आपण त्यांच्यासोबत काम केले आहे, असे म्हात्रे म्हणाल्या. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लवकरच दिलजमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.’माझा आणि गणेश नाईक यांचा कोणताही वैयक्तिक वाद नाही. जे काही आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे. त्या आमदार होतील असे सांगणारे आहेत, त्यांच्यामुळे वाद आहे, असे सांगत आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक आणि त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्षपदी डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.










