नातवंडांना भेटायला आल्या अन् काळाचा घाला, कल्याण इमारत दुर्घटनेत आई, मुलगी आणि सूनेचा मृत्यू, लेकाचा एकच आक्रोश.

कल्याण येथे इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका आई, मुलगी आणि सूनेचाही समावेश आहे.कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील श्री सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मंगळवारी झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. सप्तशृंगी इमारतीला जागोजागी तडे गेले असतानाही प्रशासनाने ही इमारत धोकादायक घोषित केलेली नव्हती. जवळपास 35 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीत 50 कुटुंबे राहत होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारपासून लादीचे काम सुरू करण्यात आले होते. यादरम्यान, इमारतीला आणखी तडे गेल्याने इमारतीचा एका बाजूचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागासह आपत्ती दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

या दुर्घटनेत प्रमिला साहू (58), मनस्वी शेलार (2 वर्षे), सुनीता साहू (37), सुजाता पाडी (32), सुशीला गुजर (78), व्यंकट चव्हाण (42) यांचा मृत्यू झाला. श्रद्धा साहू (14), अरुणा गिरनारायन (48), श्रावील शेलार (4 वर्ष), विनायक पाडी (4.5 वर्ष), यश क्षीरसागर (13) आणि निखिल खरात (26) हे जखमी झाले आहेत.मुलुंड येथे राहणान्या प्रमिला साहू नुकत्याच ओडिशातून आल्या होत्या. मंगळवारी सकाळीच त्या मुलगा, सून, नातवंडे आणि मुलीला भेटण्यासाठी कल्याणातील सप्तश्चुंगी इमारतीत आल्या होत्या. आईला भेटण्यासाठी प्रमिला यांची मुलगी सुजाता पाडी ४ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. मात्र, त्यांची ही भेट शेवटची ठरली. दुपारी झालेल्या दुर्घटनेत आई, मुलगी आणि सून या तिघींनी अखेरचा श्वास घेतला. कामावर गेलेल्या मुलगा नीलांचल याने तिघींचे मृतदेह पाहून टाहो फोडला. तर घरात आपल्या आई आजी समयेत असलेली श्रद्धा काही कारणासाठी दुसऱ्या खोलीत गेल्याने बचावली. मात्र, तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. तर दुसरीकड़े, सुजाताचा ४ वर्षाच्या विनायक या मुलाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तोही आपल्या आईला शोधत आहे.चौथ्या मजल्यावर लादीचे काम करणारा कामगार जितेंद्र गुप्ता सकाळपासून कारागीर व्यंकट चव्हाण बरोबरच होता. दुपारी त्याने जेवण आणलेले नसल्याने तो जेवण करण्यासाठी इमारतीखाली उतरला. कारागीर व्यंकट जेवून आराम करत होता. इतक्यात काळाने घाला घातला, आपण जेवून परत आल्यानंतर इमारतीतून आरडाओरडा आणि मदतीसाठी हाक ऐकू येत असल्याचं त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.