पुणे हादरलं! शिंदेंच्या शिवसेनेमधील निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, दोघेजण आले अन्… काय घडलं.

पुण्यात वारजे माळवाडी परिसरात खळबळजनक घटना घडली. शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ ही घटना घडली. सुदैवाने, घारे या हल्ल्यात बचावले. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच पुणे येथील वारजे माळवाडी परिसरामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेंच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यामधून निलेश घारे हे बचावले असून अज्ञातांचा पोलीस तपास करत आहेत.

निलेश घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ ही घटना घडली असून त्यांच्या गाडीवर गोळी लागल्याचे फोटो समोर आले आहेत.शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख असलेले निलेश घारे यांचे गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. सोमवारी घारे हे आपल्या कार्यालयात सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळबार केला. सुदैवाने घारे त्यांच्या गाडीमध्ये नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

पोलीस फायरिंग करणाऱ्यांच्या मागावर असून त्यांचा तपास करत आहेत.दरम्यान, वारजे माळवाडीमधील गणपती माथा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेली पाहायला मिळते. अशा गर्दीच्या ठिकाणी गोळीबार करण्याची हिंमत गुन्हेगार करत असतील तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर चिन्ह उपस्थित होत आहे. निलेश घारे यांच्यावर गोळीबार करणारे कोण होते? त्यांच्यावर गोळीबार कोणी करायला लावल होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.