संजय राऊत म्हणाले होते की, विरोधी गट ‘इंडिया’ मधील घटक पक्षांनी केंद्र सरकारच्या विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकावा. जर हे शिष्टमंडळ इतर देशात गेले तर ते सरकारच्या ‘पापांचे आणि गुन्ह्यांचे’ समर्थन करतील असा दावा राऊत यांनी केला.मुंबई: “जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्दे असतात तेव्हा स्थानिक पातळीवर राजकारण करू नये” असा सल्ला शरद पवारांनी संजय राऊतांना दिला आहे. संजय राऊत यांनी, भारताची बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिष्टमंडळावर बहिष्कार घालण्याचे भाष्य केले होते. केंद्र सरकारने काही सर्वपक्षीय शिष्टमंडळे स्थापन केली आहेत आणि त्यांना काही देशांना भेट देऊन पहलगाम हल्ल्याबाबत भारताची भूमिका आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या कारवाया उघड करण्याचे काम सोपवले आहे.
रविवारी १८ मे रोजी संजय राऊत म्हणाले होते की, विरोधी गट ‘इंडिया’ मधील घटक पक्षांनी केंद्र सरकारच्या विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकावा. जर हे शिष्टमंडळ इतर देशांत गेले तर ते सरकारच्या ‘पापांचे आणि गुन्ह्यांचे’ समर्थन करतील असा दावा राऊत यांनी केला.संजय राऊत यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची तुलना ‘बारात’शी केली होती. मनोरंजक गोष्ट म्हणजे संजय राऊत ज्या शिष्टमंडळावर प्रश्न उपस्थित करत आहेत त्याच शिष्टमंडळात त्यांच्याच पक्षातील नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला आहे.राऊत यांच्या विधानावर शरद पवार म्हणाले, राऊत यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो तेव्हा अशी विधाने टाळली पाहिजेत. भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी संयुक्त राष्ट्रांना पाठवलेल्या शिष्टमंडळात आपण सहभागी असल्याचे पवार म्हणाले.









