रिक्षाला धडक देऊन डम्पर नदीत कोसळला, रिक्षाचालकाच्या आईचा मृत्यू, कल्याणमध्ये भीषण अपघात.

गांधारी नदी पुलावर मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक देत डंपर थेट नदीत कोसळला. अग्निशमन विभागाकडून डंपर चालकाचा शोध सुरू आहे.कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. इतर दोन प्रवासी बचावले आहेत. जखमी तरुण रिक्षा चालक असून मयत महिला त्याची आई असल्याची माहिती आहे. जखमी तरुणाला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.गांधारी नदी पुलावर मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक देत डंपर थेट नदीत कोसळला. अग्निशमन विभागाकडून डंपर चालकाचा शोध सुरू आहे.बापगाव येथून निलेश वानखेडे हा रिक्षचालक आपल्या आईला कल्याणला रिक्षाने घेऊन जात होता. यावेळी कल्याण गांधारी ब्रिजवर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चालकाची आई मंगल वानखेडे, वय 55 वर्ष, यांचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक निलेश गंभीर जखमी झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला, तर डम्पर ब्रिजचे कठडे तोडून नदीत कोसळला. घटनास्थळी कल्याण खडकपाडा पोलीस दाखल झाले आहेत.कल्याणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने बापगाव येथून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपर पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळला, तर रिक्षातून प्रवास करणाऱ्या मंगला वानखेडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षा चालक निलेश वानखेडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान नदीपात्रात कोसळलेल्या डंपर आणि चालकाचा शोध अग्निशमन विभागाने सुरू केला आहे.दुसरीकडे, उरणनजीकच्या करळ पुलावर सोमवारी सकाळी गॅस टँकर उलटल्यामुळे वायुगळती झाली. यामुळे, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे एक तास थांबली होती.

सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील करळ पुलावरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या टँकरला अपघात होऊन तो उलटला. वायू वाहून नेणारा टँकर वळणावर उलटल्याने वायुगळती झाली. यामुळे, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद केली होती.टँकरमधील वायुगळतीचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली. जवळच असलेल्या बीपीसीएल कंपनीच्या तज्ज्ञांचे पथक आणि सिडको, जेएनपीटीचे अग्निशमन दल यांने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे जेएनपीटी बंदराच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे एक किलोमीटर अंतरावर रोखण्यात आली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.